
गडचिरोली जिल्ह्यात दिव्यांग प्रमाणपत्राच्या चौकशीची मागणी!
गडचिरोली..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
कार्यकारी संपादक.
अनुप पेश्राम
दिनांक 3/8/24
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम ,अतिदुर्गम भागाचा फायदा घेऊन काही धूर्त व संधीसाधू लोकांनी स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी अपंगाचे बोगस प्रमाणपत्र तयार करून अपगत्वाच्या नावावर अनेक शासकीय योजनांचा फायदा उठवून शासनाची फसगत व दिशाभूल करतांना दिसत आहेत.
काही काही दिव्यांग व्यक्तींनी नोकरीमध्ये स्वताच्या बढतीसाठी डॉक्टरांशी संगणमत करून दिव्यांगचे खोटे प्रमाणपत्र तयार करून अपंगाच्या नावावरती प्रशासनात उच्चस्तरावर जाऊन पोहोचल्याचे दिसून येत आहे.
स्वतःला दीव्यांग समजणारे गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत स्तरावर. ग्रामपंचायत स्तरावर आणि शिक्षण स्तरावर यांचे प्रमाण मोठ्या संख्येने दिसून येत आहेत.
गडचिरोली पंचायत स्तरावर दोन शासकीय कर्मचाऱ्यांनी डोळ्यांचे अपंगत्व दाखवून फोर व्हीलर आणि टूव्हीलर गाडी चष्मा न घालता 70 ते 80 च्या स्पीडने स्वतःची गाडी चालवून रोजच कार्यालयात जाणे येणे करून शासकीय सेवा करताना दिसत आहेत.
खरोखर जे मुळातूनच अपंग आहेत .आज त्यांना अनेक शासकिय योजने पासून वंचित राहावे लागत आहेत.आणि त्यांच्यावर हेतूपरस्पर अन्याय सुद्धा होताना दिसत आहे. जील्हात शासकीय असो.खाजगी क्षेत्रातील असोअश्या दिव्यांग व्यक्तीच्या प्रमाणपत्राची त्वरीत चौकशी करण्याची मागणी दलित पॅंथर जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आलेली आहे.