गुरुवळा ग्रामपंचायत सचिवाच्या निष्क्रिय प्रशासनाने ग्रामस्थ त्रस्त , बदलीची मागणी!
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

गुरुवळा ग्रामपंचायत सचिवाच्या निष्क्रिय प्रशासनाने ग्रामस्थ त्रस्त . बदलीची मागणी!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
कार्यकारी संपादक..
अनुप मेश्राम.
गडचिरोली .
दिनांक 3/8/24.
गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या व गुरुवळा ग्रामपंचायत मध्ये गेल्या एक वर्षापासून सचिव म्हणुन कार्यरत असलेले ,ग्रामसेवक महादेव निकुरे.यांच्या निष्क्रिय, वेळकाढू व बेजबाबदार प्रशासनावर गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली असून त्यांच्या बदलीची मागणी ग्रामस्थांत जोर धरताना दिसत आहे.
ग्रामसेवक माहादेव नीकुरे हे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रुजू झाल्यापासून कार्यालयामध्ये पूर्ण वेळ बसताना कधीचं दिसले नाही.त्यांचा कार्यालयीन वेळ इतरत्र ठिकाणी घालविण्यात गेलेला आहे.
गावातील नाल्याचां उपसा एक वर्षापासून होतच नसल्यामुळे गावातील संपूर्ण गटारे घाणीने तुळुंब भरलेले असून. गाव सभोवताल दुर्गंधी सुटताना दिसत आहे.
.रस्त्यांची समस्या ही गंभीर स्वरूपाची असताना व गावातील इतरत्र भागात चिखलाचे साम्राज्य निर्माण झालेले असताना व ही
गंभीर समस्या गाकऱ्यानपुढे उभ्या असताना गावकऱ्यांच्या गंभिर समस्याकडे हेतू पुरस्पर ग्रामसेवक माहादेव निकूरे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. असा निष्क्रिय,बेजबाबदार ग्रामसेवक गावकऱ्यांना नको नकोसा झालेला आहे.