देश-विदेश
‘बेटी बचाव,बेटी पढाओं’वर भाषण देणारे विद्यार्थींनी शिक्षकांच्या वासनेचा बळी ; गुजरातमधील प्रकार
मुख्य संपादक संतोष मेश्राम

‘बेटी बचाव,बेटी पढाओं’वर भाषण देणारे विद्यार्थींनी शिक्षकांच्या वासनेचा बळी ; गुजरातमधील प्रकार..
दिनांक 19/2/25
गुजरात ,
गुजरातच्या साबरकांठा येथून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. गुजरातमधील साबरकांठा येथे एका विद्यार्थिनीवर तिच्या शाळेतील शिक्षकाने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नराधम शिक्षकाने दहावीच्या होतकरू विद्यार्थिनीचा छळ करून तिच्यावर बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. अत्याचार झालेल्या या विद्यार्थिनीचे काही दिवसांपूर्वीच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या विषयावर झालेल्या भाषण स्पर्धेत कौतुक करण्यात आलं होतं. तिने भाषणासाठी प्रचंड टाळ्या मिळवल्या होत्या. मात्र आता हीच विद्यार्थिनी अत्याचाराला बळी पडली.