राजकिय
छत्रपती संभाजी राजे बाबत विकिपीडियावर बदनामी; मुख्यमंत्री फडणवीसाच्या मजकूर हटवण्याच्या सूचना।
मुख्य संपादक संतोष मेश्राम

छत्रपती संभाजी राजे बाबत विकिपीडियावर बदनामी; मुख्यमंत्री फडणवीसाच्या मजकूर हटवण्याच्या सूचना।
दिनांक 19/2/25.
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विकिपिडियावर जाणीवपूर्वक खोडसाळ माहिती देऊन छत्रपती संभाजी महाराजांबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात आला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची दखल घेतली असून विकिपीडियावरील मजकूर हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत