
आज 19 फेब्रुवारी रोजी ठिक ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी ।
दिनांक 19/2/25.
दरवर्षी १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दिनी शिवजयंती साजरी केली जाते. महाराष्ट्राच्या इतिहासात आणि संस्कृतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. शिवप्रेमी आणि सर्वसामान्यांसह सर्व स्तरातील लोक शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात. कुशल राज्यकर्ता, पराक्रमी योद्धा आणि मुघलांचा पराभव करणारे असे छत्रपती शिवाजी महाराज होते, तसेच ते शौर्य, वैभव, दया आणि औदार्य यांचे प्रतिक होते. अशा आदर्श शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!