
धक्कादायक ! पत्नीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार ; आरोपींनी साक्षीदार पतीलाही जिवंत जाळले..
दिनांक 19/2/2025
उत्तर प्रदेश/ मैनपुरी ,
उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये अतिशय धक्कादयक घटना घडली आहे. पत्नीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील साक्षीदार पतीला आरोपींनी डिझेल टाकून जिवंत जाळले. नातेवाईकांनी कपड्याच्या आधारे मृताची ओळख पटवली. या घटनेनंतर मृताच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी अर्धा जळालेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे.