देश-विदेश
Muda, घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दिलासा लोकायुक्तांनी दिली क्लीन चिट ।
मुख्य संपादक

Muda, घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दिलासा लोकायुक्तांनी दिली क्लीन चिट ।
दिनांक 19/2/2025.
कर्नाटक,
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मुख्य आरोपी असलेल्या म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) जमीन घोटाळ्याचा तपास पूर्ण झाला आहे. म्हैसूर लोकायुक्तांनी आपल्या चौकशी अहवालात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांच्या पत्नी आणि इतर आरोपींना क्लीन चिट दिली आहे. लोकायुक्तांनी तक्रारदार स्नेहमयी कृष्णा यांना नोटीस पाठवली आहे. यात म्हटले आहे की, पुराव्याअभावी या प्रकरणाची चौकशी करणे योग्य नाही. तसेच, पुराव्याअभावीही अहवाल दाखल केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. याचबरोबर, तक्रारदाराला दंडाधिकाऱ्यांसमोर अहवालाला आव्हान देण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.