
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाचा सातारा परिसरात अपघात …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक- 21/03/2024.
सातारा :-
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाचा सातारा परिसरात अपघात झाला. साताऱ्यात वाई जवळ हा अपघात घडला. रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिल्याची माहिती मिळाली आहे. रामदास आठवले वाईहून मुंबईच्या दिशेला येत होते. या दरम्यान एका कंटेनरने त्यांच्या कारला धडक दिली.
या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले, परंतु सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरुप बचावले. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेला रवाना झाले.