कार्यकारी अभियंता साखरवाडे ला लागले गडचिरोली सा.बा.विभागाचे वेड….
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

कार्यकारी अभियंता साखरवाडेला लागले गडचिरोली सा.बा.विभागाचे वेड….
गडचिरोली.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमाक 1 मध्ये अंदाजे तीन ते चार वर्षापासुन दडी मारून बसलेले,कार्यकारी अभियंताचे राजेशाही थाटात ऐश्वर्य उपभोगणारे कार्यकारी अभियंता साखरवाडे यांची नुकतीच बदली गडचिरोली वरून मुंबई येथे झाली असताना सुद्धा
. मुंबई येथे दोन तीन महिन्याच्या कालावधी लोटून पुन्हा गडचिरोली येथील सा. बा विभाग क्रमाक 2 मध्ये रुजू होण्याच्या मार्गवर आहेत.अशी सर्वत्र चर्चा सुद्धा केली जातं आहे. गडचिरोली
सा. बा.विभाग क्र.2 मध्ये कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता एस. डी. उसेंडी यां विभागातअनेक दिवसांपासून निष्ठेने,प्रामाणिक पणे कामे व शासकीय सेवा देत असताना व शासनानी त्यांना एक वर्षाची मुदत वाढ़ दिली असताना सुद्धा. कार्यकारी अभियंता साखरवाडे यांनी गडचिरोली येथे आपली पदस्थापना करून कार्यकारी अभियंता उसेंडी यांची बदली करून त्यांना गोंदिया येथे पाठविण्यात आल्याची चर्चा आहे.
गडचिरोली वरून मुबई येथे बदली झालेले कार्यकारी अभियंता पुन्हा गडचिरोली सा. बा.विभागतं रुजू व्हावे.ही किती टिकात्मक बाब म्हणावी लागेल.
कार्यकारी अभियंता साखरवाडे यांना जर गडचिरोली जिल्ह्याचे एवढे आकर्षण होते तर त्यांनी आपली बदली गडचिरोलीचे जिल्हा परिषद बांधकाम विभाग, किव्हा सिरोंचा सारख्या ठिकाणी आपली बदली करून नव्याने रुजू व्हायला पाहिजे होती.अशी कार्यालयीन कर्मचाऱ्यात चर्चेला उधाण आलेले आहे.
साखरवाडे यांची गडचिरोली येथे झालेली बदली ही हेतूपुरस्पर व सुड बुद्धीने केलेली असावी असे अनेक तर्क वितर्क सगडीकडे चर्चीले जात आहे.
. साखरवाडे यांची गडचिरोली येथे झालेली बदली त्वरित रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते. पत्रकार, दलित पॅंथरचे जिल्हा अध्यक्ष अनुप मेश्राम यांनी केलेली आहे.