मुंबई
मुंबईतल्या अभिनेत्रीला अटक करुन 40 दिवस ठेवले कोठडीत ; 3 IPS अधिकाऱ्यांचे थेट निलंबन ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

मुंबईतल्या अभिनेत्रीला अटक करुन 40 दिवस ठेवले कोठडीत ; 3 IPS अधिकाऱ्यांचे थेट निलंबन ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
मुंबई .
दिनांक .17/09/2024.
आंध्र प्रदेश सरकारने एक मोठे पाऊल उचलत रविवारी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले. मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेलला चुकीच्या पद्धतीने अटक आणि छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांवरच कारवाई झाल्याने हे प्रकरण आता चर्चेत आलं आहे. अभिनेत्रीने तिच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात योग्य तपास न करता घाईघाईने अटक करण्यात आणि छळ केल्याचा आरोप केला होता.