मुंबई
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात पार पडणार सी आर पी एफ अधिकाऱ्याचा विवाह सोहळा
मुख्य संपादक

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात, पार पडणार सी आर पी एफ अधिकाऱ्याचा विवाह सोहळा..
दिनांक 4/2/2025.
राष्ट्रपती भवन,
राष्ट्रपती भवनात ज्या अधिकारी महिलेचे लग्न होणार आहे, त्यांचे नाव आहे पूनम गुप्ता. पूनम गुप्ता या सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव दलात अधिकारी असून, त्या राष्ट्रपती भवनात पीएसओ म्हणून कार्यरत आहेत. पूनम गुप्ता यांनी ४७व्या प्रजासत्ताक दिनाच्या पथ संचलनामध्ये सीआरपीएफच्या सर्व महिला तुकड्यांचे नेतृत्व केले होते. पूनम गुप्ता यांचे लग्न राष्ट्रपती भवनात होत असल्याचे रिपोर्टस समोर आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, पूनम गुप्ता यांचे लग्न असिस्टंट कमांडन्ट अवनीश कुमार यांच्यासोबत होणार आहे. अवनीश कुमार हे जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहेत.