तरुणांच्या श्रमदानातून शेतकऱ्यांनसाठी केली पांदन पायवाट सुरू.!
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

तरुणांच्या श्रमदानातून शेतकऱ्यांनसाठी केली पांदन पायवाट सुरू.!
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली.( जिल्हा प्रतिनिधी)
दिनांक (१७ सप्टेंबर).
धानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या, गट ग्रामपंचायत तूकम या ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पांदन रस्त्याचे काम करण्यात आले. पादन रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून, रस्त्यासाठी खर्च केलेले लाखो रुपये व्यर्थ गेलेले असल्याचे सांगितले जात आहे.
सदर पांदन रस्त्याचे काम करताना गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला अनेकदा विनंती केली.लेखी निवेदनही देण्यात आले. प्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने गावात ग्रामसभा ही घेण्यात आली.
परंतु गट ग्रामपंचायत मध्ये कार्यरत प्रशासनाला जागच न आल्यामुळे रस्त्यावरून लोकांचे जाणेयेणे व कामाला होत असलेले सतत अडथळे थांबवण्यासाठी .अखेर त्याच गावातील अंकुश गोठा. सोनु मडावी, अंतराम हलामी काशिनाथ वड्डे, गोपाल करगामी हनुमान नेताम ,ज्योतीराम होडी, गावातील.अश्या अनेक तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या श्रमदानातून शेतकऱ्यांच्या पांदन रस्त्याची डागडूगी करून गावकऱ्यांसाठी व शेती कामासाठी येण्या-जाण्याचां लोकांना मार्ग मोकळा करून शेतकऱ्यांची व गावकऱ्यांची कायमची डोकेदुखी दूर केली .
परंतु सुस्त व निष्क्रिय प्रशासनाला अजूनही जाग आलेली नसल्याचे गावकऱ्याकडून सांगितले जात आहे.