
रक्ताचे डाग ,फाटलेले कपडे ; पालघरमघ्ये 10 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 12/09/2024.
पालघर ,
गणपती आगमन मिरवणूक बघायला गेलेल्या दहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्या सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना पालघरमध्ये घडली आहे. ३० वर्षाच्या दोन नराधमांनी मुलीला अडवले आणि निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या.