क्राईम
धक्कादायक ! लातुरच्या महापालीका आयुक्तांनी स्वतः च्याच डोक्यात गोळी झाडली ; उपचार सुरू …
मुख्य संपादक

धक्कादायक ! लातुरच्या महापालीका आयुक्तांनी स्वतः च्याच डोक्यात गोळी झाडली ; उपचार सुरू …
लातुर ,
लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. ही घटना बार्शी रोडजवळील शासकीय निवासस्थानी घडली. त्यावेळी सुरक्षारक्षकासह परिवारातील सदस्यांनी मनोहरे यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना व्हेंटिलेटवर ठेवून उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर काही वेळाने त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. मनपा आयुक्त मनोहरे यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा नेमके काय घडले, आणि त्यांनी डोक्यात गोळी झाडून का घेतली, याचा पोलिस तपास करीत आहेत.