अपघात
गोंदिया – कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात ! 11 जणांचा मृत्यू ; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

गोंदिया – कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात ! 11 जणांचा मृत्यू ; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 29/11/2024.
गोंदिया-कोहमारा ,
शिवशाही बस उलटून 11 प्रवासी ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ घडली. या घटनेत २० ते २५ प्रवासी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया-काेहमारा मार्गावर डव्वा जवळ झालेल्या अपघाताची माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्याकडून घेतली. तसेच प्रशासनाला त्वरित आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.