तरुणांच्या ऊर्जेला जागृत करणारा उत्तम मार्ग म्हणजे स्वामी विवेकानंद: रवींद्र मुप्पावार
मुख्य संपादक

तरुणांच्या ऊर्जेला जागृत करणारा उत्तम मार्ग म्हणजे स्वामी विवेकानंद: रवींद्र मुप्पावार.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
सावली :- ( तालुका प्रतिनिधी )
भारत सरकारने 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे तरुणांच्या शाश्वत ऊर्जेला जागृत करण्याचा आणि प्रेरित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे, परिणामी संपूर्ण देशाची समृद्धी होईल असा देशाला विश्वास आहे.स्वामी विवेकानंदाला प्रत्येक मुलांमध्ये देशासाठी आशेचा किरण दिसला कारण देशातील मुले आणि तरुण सामाजिक बदल घडवून आणू शकतात असा त्यांचा विश्वास होता असे अध्यक्षस्थानावरून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार बोलत होते.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रनिर्माते,युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय रवींद्र मुप्पावार होते विचार पिठावर पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम,राजश्री बिडवई,राजेश मांदाडे,संजय ढवस,प्रदीप कोहळे उपस्थित होते.
जयंती निमित्य विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम यांनी ”जीवनात जोखीम पत्करा,जिंकलात तर नेतृत्व कराल, हरलात तर मार्ग दाखवाल ” असे विचार मांडून मार्गदर्शन केले तसेच विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक प्रदीप कोहळे यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका काजल बारापात्रे यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षिका वनिता गेडाम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले.