Breaking
चंद्रपूरसावली

कायमस्वरूपी वेतन मिळावे म्हणून अंगणवाडी सेविका 4 डिसेंबर पासून संप सुरूच

मुख्य संपादक

 

कायमस्वरूपी वेतन मिळावे म्हणून अंगणवाडी सेविका 4 डिसेंबर पासून संप सुरूच….

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज 

मुख्य संपादक 

दि.07/12/23

चंद्रपूर      :-  (  सावली  ).

 

 

 

मानधन नको, वेतन हवे, या मागणीबाबत अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा लढा सुरू आहे. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने दि.4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर असून. तसे निवेदन एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला देण्यात आले आहे.

तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी गुरुवारी तहसील कार्यालयाच्यासमोर ठिय्या मांडला. व आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार ला आंदोलन ली तहसील कार्यालयापासून तर पंचायत समिती पर्यंत काढण्यात आली. या वेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी युनियनच्या सावली तालुकाध्यक्ष सौ. चंद्रकला सहारे यांनी जोपर्यंत मागण्यांची सरकार दखल घेत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे सांगत मागण्यांसाठी एकजूट कायम ठेवून हक्कासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

निवेदनात म्हटले आहे, की राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्या, सन्मानजनक वेतनवाढ, दरमहा पेन्शन यासह विविध मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्यभर आंदोलने सुरू होती. राज्य शासन व प्रशासनाशी वारंवार चर्चा करण्यात आली. परंतु मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने 4 डिसेंबरपासून राज्यभर बेमुदत संप जाहीर केला आहे. चालू महिन्यातील कुठलीही माहिती, अहवाल देणे, तसेच मासिक बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कृती समितीचे घेतला आहे.

 

 

 

आज या संपाचे निवेदन सावली तहसीलचे तहसीलदार व पंचायत समितीचे बालविकास अधिकारी यांना देण्यात आले या वेळेस युनियन चे अध्यक्ष चंद्रकला सहारे, उपाध्यक्ष प्रज्ञा दुधे,सचिव अर्चना पाल,अर्चना इंदुरकर,तील्लोत्मा कोरडे,रंजिता दहेलकर,कांचन संतोषवार,विमल इमलवार,व तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी निवेदन दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे