
सावली येथील माजी सभापती कृष्णा राऊत यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
दिनांक 04/10/2024..
चंद्रपूर / मुल / सावली !
आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होवून, तसेच ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सामाजिक बांधिलकी, सर्व समाजाला न्याय देण्याहेतू सुरु असलेले अथक प्रयत्न, सामान्यांप्रती असलेली आपुलकी, सामान्य कार्यकर्त्यांची जाण, व क्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांचा तडाखा अशा विविध कार्यामुळे प्रेरित होऊन भाजपाचे सावली पंचायत समिती माजी सभापती तथा भोई समाज नेते कृष्णा राऊत यांचे सह भारतीय जनता युवा मोर्चा आदिवासीं सेल तालुका अध्यक्ष रुपेश दडमल व शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कुचंबना होत असून मागील १० वर्षात त्यांना कुठलाही न्याय देण्यात आला नसल्याने भाजपाला रामराम ठोकत असल्याचे मत माजी पंचायत समिती सभापती कृष्णा राऊत यांनी व्यक्त केले.
पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी सावली नगरपंचायत उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार, माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, प्रशांत राईंचवार, सभापति प्रीतम गेडाम, सीमा संतोषवार, प्रियंका रामटेके,नगरसेवक नितेश रस्से, गुणवंत सुरमवार, ज्योती गेडाम, ज्योती शिंदे, साधना वाढई, अंजली देवगडे, चंद्रकांत संतोषवार, आकाश खोब्रागडे, निखिल दुधे, मिथुन गणवीर, गब्बर दुधे व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.