जिवती येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन !
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि पालकांनी समन्वय साधावा :- गजानन पाटील जुमनाके !

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि पालकांनी समन्वय साधावा :- गजानन पाटील जुमनाके !
जिवती येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
चंद्रपूर
जिवती :- शिक्षक हा विद्यार्थी घडविण्याचे महान कार्य करतो सोबतचं विद्यार्थी विकासासाठी स्वतःला झोकून देऊन काम करतो परंतु पालक म्हणून आपण कुठंतरी कमी पडू नये त्यासाठी शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असावा आणि विद्यार्थी विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न व्हावे असे प्रतिपादन गोंडवाना शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केले, ते जिवती येथे आयोजित शासकीय आश्रम शाळेच्या प्रवेशोत्सव मेळाव्यात ते बोलत होते.
पुढे जुमनाके बोलताना म्हणाले की, शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडविण्यासाठी माध्यमिक आश्रम शाळेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आदर्श विद्यार्थी घडविण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
माजी सभापती भीमराव मेश्राम, जेष्ठ नेते भीमराव पा. जुमनाके, नगरसेवक श्यामराव गेडाम, नगरसेवक मारोती कुमरे, माध्यमिक आश्रम शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाडू कोडापे, मुख्याध्यापक पवार सर पालकांसह विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.