गडचिरोली
कोटगल ग्रामपंचायतीने सुरु केला घरापुढे कचरा टाकायचा उपक्रम!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

कोटगल ग्रामपंचायतीने सुरु केला घरापुढे कचरा टाकायचा उपक्रम !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली ( दि.07.डिसेंबर )
कोटगल येथे वास्तव्याने असलेले नवकेतन मेश्राम यांच्या राहात्या घरापुढे,आजूबाजूच्या लोकांनी सतत कचरा टाकून घाणीचे साम्राज्य तयार करून घर परिसरापुढे दुर्गधी पसरविण्याचे कामे करीत आहेत.
ही गंम्भीर स्वरूपाची बाब ग्रामसेवक, सरपंच, निवडून आलेल्या सभासदांच्या डोळ्या पुढे रोजच दिसत असताना सुद्धा ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्या लोकांनावर कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही.
सबंधित प्रशासनाने जातीने लक्ष घालून नवकेतन मेश्राम यांच्या घरापुढील टाकलेला कचरा त्वरित हटवून कचऱ्याच्या बंदोबस्त दुसऱ्या ठिकाणी करण्याची मागणी नवकेतन मेश्राम यांनी केली आहे.