
वंदना सुत्रपवार च्या मृत्यूने सावलीकर हळहळले…
चंद्रपूर। / सावली
दि.28/डिसेंबर 23
सावली शहरातील प्रभाग क्रमांक 14 येथील रहिवाशी दीपक सूत्रपवार यांच्या पत्नी वंदना सूत्रपवार यांच्या आकस्मित निधनाने संपूर्ण सावली कर हळहळ व्यक्त करीत आहे. त्यांच्यावर उद्या दिनांक 29 ला सकाळी 11 वाजता सावली ला अंत्यसंस्कार केले जाणार आहे.वंदना चे अवयव दान च्या निर्णयाने एम्स ने आभार मानले आहे.
चार दिवसापूर्वी घरीच वंदना सुत्रपवार या काम करीत असतानाच डोक्यावर पडली त्यानंतर तिला सावली, चंद्रपूर व नंतर नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याचा मागील भागात जबर मार लागल्याने त्यांचा ब्रेनडेड झालेला होता अनेक उपचारांती त्यांचा अखेर आज सकाळी मृत्यू झाला मात्र संपूर्ण शरीर भाग चांगला असल्याने त्यांनी अवयव दान करावे असे एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्या परिवारांना सांगितले त्यावरून वंदनाचे पती दीपक, मुलगा मयूर, मुलगी ममता व आप्तेष्ट परिवार सोबत चर्चा करून अवयवदान करण्याच्या निर्णय घेतला.आणि आज त्यांच्या मृत्यू नंतर शरीरातील काही अवयव दान करण्यात आले. सुत्रपवार यांच्या निर्णयाने एम्स रुग्णालयाने त्यांच्या सन्मान पत्र देवून गौरव केले. मृत्यू नंतर त्या अवयाने कुणाचे तरी जीवन वाचणार असल्याने एम्स च्या डॉक्टरांनी आभार मानले.
स्व.वंदना दीपक सुत्रपवार यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.सर्वांसोबत आपुलकीने बोलणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.त्यांच्या अशा आकस्मिक निधनाने अनेकजण भावून झाले. तर त्यांच्या अवयव दान करण्याच्या निर्णयाने अनेक जण त्यांच्या सामाजिक बांधिलकी निर्णयाबद्दल कृतज्ञा व्यक्त करीत आहे.