प्रियकर आणि प्रेयसीने लावला गळफास; आत्महत्येचे नेमके कारण काय? शोधमोहीम सुरुच …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 16/5/24.
आरमोरी/गडचिरोली
(suicide case) : आरमोरी येथील एका अल्पवयीन प्रियकर आणि प्रेयसी या दोघांनीही एकाच वेळेस (suicide case) गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात, प्रियकराचा मृत्यू झाला. प्रेयसीचे पाय जमिनीवर लागल्याने ती बेशुद्ध पडल्याने थोडक्यात बचावली. ही घटना सायंकाळी ५ ते ७ वाजताच्या दरम्यान आरमोरी तहसील कार्यालय आरमोरी येथे घडली.
प्रियकराचा मृत्यू तर प्रेयसी उपचारासाठी दवाखान्यात
माहितीनुसार, मृत अल्पवयीन प्रियकराचे नाव संजय ( बदललेले) रा.आरमोरी असे आहे. अल्पवयीन युवतीची प्रकृती खालावली असल्याने तिला ब्रम्हपुरी येथील एका आरमोरी हाँस्पीटलमध्ये खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. दोघांनीही गळफास नेमका कोणत्या कारणामुळे घेतला याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.