Breaking
गडचिरोली

अन्यायग्रस्त पोलीस भरती उमेदवारांचे बेमुदत उपोषण!

अनुप मेश्राम :- पत्रकार

 

अन्यायग्रस्त पोलीस भरती उमेदवारांचे बेमुदत उपोषण! 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज

कार्यकारी संपादक

अनुप मेश्राम.

गडचिरोली.( दि.,12.

धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने भटक्या जमाती( क ) प्रवर्गातील बोगस झाडे जातीची घुसखोरी थांबवण्यासाठी अन्यायग्रस्त पोलीस उमेदवारांचे बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर दिनांक 10 ऑक्टोंबर पासून त्यांनी आपल्या बेमुदत उपोषणाला सुरवात केलेली आहे.

 2021 मध्ये झालेल्या गडचिरोली पोलीस भरती मध्ये तीन बोगस झाडे उमेदवारांची नियुक्ती झालेली असताना, व नियुक्ती होऊन वर्षभराचा कालावधी लोटला जात असताना उमेदवारांनी जातं पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसताना सुद्धा पोलीस विभागानी बोगस भरती उमेदवारांना अजून पर्यंत बडतर्फे करण्यात आलेले नाही.

 तसेच 2022 मध्ये झालेल्या पोलीस भरती मध्ये 10 बोगस झाडे उमेदवारांची निवड झालेली असताना व जात पडताळणी अवैध ठरविलेल्या उमेदवारांची त निवड त्वरित रद्द करून त्यांचेवर फोजदारी कारवाही करण्याची मागणी उपोषण कर्त्यांनी केलेली आहे.

.तसेच राज्य राखीव पोलीस दलातर्फे काटोल नागपूर येथे 2021 मध्ये भरती झालेल्या 5 बोगस झाडे उमेदवारांची नियुक्ती बोगस असल्याचे अनेक आक्षेप घेतल्यानंतरही उमेदवारांची झालेली नियुक्ती रद्द करण्यासाठी उपोषण कर्त्यांनी गडचिरोली पोलीस विभाग,जिल्हा जात पडताळणी समिती, व राज्य राखीव पोलीस बल विभागांच्या विरोधात खालील मागणी घेऊन पोलीस भरती अन्याग्रस्त उमेदवार जिल्हा धिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणला बसलेले आहेत. 

उपोषण कर्त्यांच्या प्रमुख मागण्या

01) गडचिरोली 2021 मध्ये झालेल्या पोलीस भरती मध्ये निवड झालेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील बोगस भरती उमेदवारांना सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्या उमेदवारांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे

02) गडचिरोली पोलीस भरती 2022 मध्ये निवड झालेले भटक्या जमाती क प्रवर्गातील उमेदवारांची जात वैधता रद्द झालेली आहे अश्या बोगस उमेदवारांनावर गुन्हे दाखल करून त्यांची झालेली निवड रद्द करण्यात यावी

03) भटक्या जमाती क प्रवर्गा तील बोगस झाडे उमेदवारांची जात पडताळणी समितीने तात्काळ जात वैद्य ठरवावे

04) गडचिरोल पोलीस भरतीची प्रतिक्षा यादीतील खऱ्या भटक्या जमाती क उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावे.राज्य राखीव पोलीस भरती काटोल येथील बोगस झाडे उमेदवारांना बडतर्फ करण्यात यावे इत्यादी मागण्या घेवून उपोषण कर्त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरवात केलेली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे