वनरक्षक दुर्गे यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी! योगाजी कुडवे!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

वनरक्षक दुर्गे यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी ! योगाजी कुडवे!
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली/ आंबेशिवणी
दि. 3 /10/ 2023 .
आंबेशिवणी येथे वनरक्षक दुर्गे यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना करतांना ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता कागदोपत्री वन समिति स्थापन करून वनसमितीच्या नावावर बँक खाते तयार करून खात्यात रक्कम जमा केलेली आहे.
संयुक्त वन व्यवस्थापन समिती ही ग्रामपंचायतची उपसमिती असताना सुद्धा व समिति स्थापन करतांना ग्रामसभेची परवानागी असणे बंधनकारक असताना दुर्गे वनरक्षक यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वताच्या मनमर्जिणे कागदोपत्री संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना केलेली आहे.
या समितीस वनरक्षक दुर्गे हेच जबाबदार असून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यासाठी दिनांक 05 /10 /2023 पासून मुख्य वन संरक्षक वनवृत्त कार्यालय समोर बेमुदत आंदोलना करण्याचा इशारा योगाजी कुडवे यांनी दिलेला आहे दिलेला आहे.