
मुलचेराचे तहसीलदार यांची उत्कृष्ट कामगिरी,तहसीलदार चेतन पाटील यांचा गौरव.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दि.29.जाने.24
मुलचेरा : तालुक्याचे तहसीलदार चेतन पाटील यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांच्या कार्यालयामार्फत राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मुलचेरा चे तहसीलदार चेतन पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आले. लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केले होते. त्यास अनुसरून सन २०२३ मधील मतदार यादीतील तक्रारीचे निवारण, अद्यावतिकरण, मतदार यादीत नवीन मतदारांचे नाव नोंदणी करिता नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या कामगिरी बद्दल मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील यांचा सन्मान करण्यात आला होता. राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाला डॉ परशुराम खुणे, प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपजिल्हाधिकारी निवळणुक अधिकारी प्रसेंजित प्रधान, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी उपस्थित होते.