देश-विदेश
घरी भिक मागण्यासाठी येणाऱ्या भिकाऱ्याच्या प्रेमात पडली महिला ,पती अन् सहा लेकरांना सोडुन गेली पळुन ।
मुख्य संपादक :-संतोष मेश्राम

घरी भिक मागण्यासाठी येणाऱ्या भिकाऱ्याच्या प्रेमात पडली महिला ,पती अन् सहा लेकरांना सोडुन गेली पळुन ।
दिनांक 8/01/25.
उत्तर प्रदेश,
उत्तर प्रदेशच्या हरदोईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे कथितपणे एक सहा मुलांची आई असलेली महिला एका भिकाऱ्यासोबत पळून गेली. महिला आपला पती आणि मुलांना सोडून पळून गेली. ज्या भिकाऱ्यासोबत ही महिला पळून गेली, तो तिच्या घरी भीक मागायला येत होता आणि हात बघून भविष्यही सांगत होता. दरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं. महिलेच्या पतीचा आरोप आहे की, पत्नी भिकाऱ्यासोबत फरार होण्यासोबतच घरातील पैसेही घेऊन गेली. पोलिसात याबाबत तक्रार देण्यात आली असून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.