
शिर्डीत फक्त दर्शनाथीँसाठीच मोफत भोजन; प्रसादालय भोजन व्यवस्थेत मोठा बदल..
शिडीँ ,
दि.6/2/2025.
साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात देण्यात येणारी मोफत भोजन व्यवस्था यापुढे केवळ भाविक व संस्थान रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठीच असेल. अन्य नागरिकांना प्रसादालयात भोजन करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. गुरुवारपासून (दि. ६) या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. भाविकांना प्रसाद भोजन घेणे अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी संगितले.