शिर्डी येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत , “ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची” शिबिराचा शुभारंभ…
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि. 03/01/2024
शिडिँ :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथे “ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची” अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला आज पासून शुभारंभ झाला. यावेळी, आदरणीय साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून, ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, संसदरत्न खासदार मा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष, आमदार मा. जयंतराव पाटील, पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा. हेमंत टकले, राज्यसभा खासदार मा. फौजिया खान, आमदार मा. अनिल देशमुख, आमदार मा. अशोक पवार, आमदार मा. बाळासाहेब पाटील, आमदार मा. अरुण लाड, आमदार मा. संदीप क्षीरसागर, प्रदेश सरचिटणीस मा. बसवराज पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. मा. रोहिणीताई खडसे व यांसह इतर प्रमुख मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.