
वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एक महिला ठार …
वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एक महिला ठार …
*दणका कायद्याचा डिजिटल न्युज*
*गडचिरोली। / वाकडी*
गडचिरोली पासुन पाच कि.मि. अंतरावर असलेल्या वाकडी येथे वाघांच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना दि 03/01/2024 ला दुपारी 1.वाजताच्या सुमारास घडली.
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव नामे.सौ.मंगला बोळेंवय 50 वर्ष रा.वाकडी ता.जि.गडचिरोली येथील रहिवासी आहे.
ही महिला आपल्या शेतात काम करीत असताना व शेताला लागून जंगल असल्याने सरपण गोळा करीत असतांना अचानक झुडपात दाबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला केला व तिला फरकडत नेल्याने ति महिला जागीच ठार झाली. हि माहिती वनविभागाला कळताच वनविभागाने घटणा स्थळी दाखल झाले. व म् त्य पावलेल्या महिलेला गडचिरोली रुग्णालयात शवविच्छेदन करीता पाठविण्यात आले.
लोकांत दहशत पसरली असुन असे कित्येक जिव गमवावे लागले आहे. त्यामुळे लोकांनी सर्वत्र वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.