
अमेरिकेने घेतला कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याचा निर्णय, भारताला दिलासा…
दिनांक 2/2/25.
दणका कायद्याचा न्युज .
अमेरीका ,
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांची मैत्री सर्वश्रृत आहे. विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी अनेकदा एकमेकांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मैत्रीचे उदाहरण ठेवले आहे, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जो शनिवारी संध्याकाळपासून लागू झाला. मात्र यामध्ये भारताचे नाव नाही.