नागभीड येथे मनोरुग्ण महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- खासदार डॉ. नामदेव किरसान.
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

नागभीड येथे मनोरुग्ण महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- खासदार डॉ. नामदेव किरसान.
नागभीड .
दिनांक 24/8/24.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
नागभीड येथील मनोरुग्ण महिलेवर काही नराधमांनी अत्याचार करून तिची अब्रू लुटली हे अतिशय घृनास्पद कृत्य असून अश्या नराधम आणि राक्षस प्रवृत्तीच्या लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, महिलांच्या सुरक्षेकरीता सरकारने कठोर पाऊल उचलावे अशा मागण्यांना घेऊन, वारंवार होत असलेल्या अश्या अमानवीय कृत्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने कांग्रेस कार्यालयापासून राम मंदिर चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. व निवेदन देण्यात आले *यावेळी चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवरजी किरसान*, चिमुर विधानसभा समन्वयक डॉ. सतिशभाऊ वारजूकर, नागभीड तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी, शिवसेना उबाठ गट तालुका अध्यक्ष बंडू पांडव, नागभीड तालुका राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष रियाज शेख, शाहरुख शेख, चिमुर विधानसभा महिला अध्यक्ष नितुताई गुरपुडे, नागभीड महिला कांग्रेस अध्यक्ष प्रणायताई गड्डमवार,नागभीड शहर कांग्रेस अध्यक्ष किशोर समर्थ, नागभीड महिला शहर कांग्रेस अध्यक्ष सुनीता डोईजड,माजी नगरसेवक आशाताई गायकवाड,ज्योतीताई चिलबुले,योगिता मिसार या संपूर्ण महाविकास पदाधिकारी व महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.