ठिय्या आंदोलनातून घेतले जात आहेत अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्यांचें बळी!
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

ठिय्या आंदोलनातून घेतले जात आहेत अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्यांनचें बळी!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक
अनुप मेश्राम.
गडचिरोली.(दि.२४.८.२४.
गडचिरोली जिल्हयात ठिय्या आंदोलन कार्यकर्त्यांनी आतापर्यंतआत्तापर्यंत मुख्य वनसंरक्षक वनवृत्त यांच्या कार्यालयापुढे काही ठराविक कार्यकर्त्यानच्या माध्यमातून जी काही ठिय्या आंदोलने केली जात आहेत.या होत असलेल्या ठिय्या आंदोलनातून आतापर्यंत अनुसुचित जातींच्या अधिकाऱ्यांचा विशेष बळी घेतल्या जात असल्याचे निदर्शनात येत आहे.
ठिय्या आंदोलन कार्यकर्त्यांच्या आदोलणातून बळी घेतलेले
वनपरिक्षेत्र अधिकारी शेरेकर आल्लापल्ली.,वनरक्षक मोरे. आंबेशिवणी,.वनपरिक्षेत्र अधिकारी गणवीर. आल्लापल्ली क्षेत्र सहाय्यक झाडे आलापल्ली यांच्या सारखे कर्तव्यदक्ष, अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचारांनचे अनेक भ्रष्ट आरोप ठेवून याच अधिकाऱ्यांना बळीचे बकरे दिले जात असल्याचे दिसून येत आहेत.
ठिय्या आंदोलन कार्यकर्त्यांनी आपल्या करीत असलेल्या आंदोलनातून इतर एकही अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे कृष्णकृत्त्य आतपर्यंत कधी कुणापुढे सामोर आणताना केव्हाच दिसले नाही.
या होत असलेल्या आंदोलनातून त्यांचा एकही अधिकारी बळी जाताना कधीचं दिसलेला नाही.फक्त हे आंदोलन अनुसूचित जातींच्या अधिकाऱ्यानं साठी ठेवले आहे का?असे अनेक तर्क वितर्क अनेक विचारवंत लोकात चर्चिले जात आहेत. तसेच दलित पॅंथर जिल्हा कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीत हा एक चिंतनाचा गंभीर सुर सतत उमटताना दिसत आहे. हे विशेष.