क्राईमदेश-विदेशमहाराष्ट्र
पाँक्सो गुन्हात जामिनावर बाहेर आलेल्या ,शिक्षकाकडुन शाळेतील मुलींशी पुन्हा अश्लील चाळे …
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

पाँक्सो गुन्हात जामिनावर बाहेर आलेल्या ,शिक्षकाकडुन शाळेतील मुलींशी पुन्हा अश्लील चाळे …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
निगडी .
बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना निगडी येथेही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सहा वर्षांपूर्वी शाळेतील एका मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या खेळाच्या शिक्षकाने या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच शाळेतील तेरा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या शिक्षकाला निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे. तसेच एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतरही पुन्हा त्याला शाळेत घेतल्याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यांसह ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनीअटक केली आहे.