Breaking
भद्रावती

पत्त्यांचा जुगार खेळणे पडले महागात,अडकले पोलीसांच्या जाळ्यात

मुख्य संपादक

 

 

पत्त्यांचा जुगार खेळणे पडले महागात,अडकले पोलीसांच्या जाळ्यात

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज

भद्रावती :-

तालुक्यातील तांडा गावामागील जंगलात सुरू असलेल्या एका जुगारावर भद्रावती पोलिसांनी धाड टाकीत जुगार खेळणाऱ्या आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती भद्रावती पोलिसां तर्फे देण्यात आली. सदर कारवाई 26 जानेवारीला तांडा गावाजवळील जंगलात करण्यात आली. सदर घटनेत चार लक्ष 62 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका गोपनीय माहिती द्वारे तांडा गावाच्या मागच्या भागातील जंगलात जुगार सुरू असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी एक पथक कारवाईसाठी घटनास्थळी रवाना केले. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांपैकी काही जुगारी जंगलात पळून गेले तर आठ जुगारी पोलिसांच्या हाती लागले. या कारवाई जुगारातील पैसे व आठ मोटरसायकली असा चार लक्ष 62 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला. सदर आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किटे, कोल्हे तथा इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

2/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे