स्वप्नील काशीकर ला अभय कुणाचे? युवा सेना (उबाठा )शहर प्रमुख शिवा वझरकर हत्येप्रकरणी काशीकर सहीत इतर 7आरोपी अटकेत : राजकारण वाळू तस्करीचे…
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
चंद्रपूर :-
26जानेवारी 2024
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेना चंद्रपूर शहर प्रमुख शिवा मिलिंद वझरकर याची चंद्रपूर शहरात आज रात्री 9:30 वाजता च्या दरम्यान हत्या ; हत्येचे कारण अस्पष्ट, पोलीस तपास सुरु.
खुणाच्या घटनेच्या थोडक्यात हकिकती नुसार, यातील फिर्यादी हे त्याचे मित्रासह बोलचाल करीत असताना आरोपी क्र.1 हिमांशु कुमरे, वय 25 वर्षे, याने यातील मृतकास फोन करुन वडीलांना बरेवाईट बोलून बोलावल्याने आरोपीने बोलावल्या ठिकाणी गेले असता मृतक शिवा मिलिंद वझरकर,वय 23 वर्षे यास जुन्या पैशाच्या वादावरुन व मृतकाचे वडीलांना बरेवाईट बोलल्याचे कारणावरुन आरोपींनी तसेच हिमांशु कुमरे याने लोखंडी चाकूने शिवा वझरकरचे पोटावर चाकूनू वार करुन आणि त्याचे सह असलेले ईसमांनी खाली पडल्यावर लाथांनी मारुन जिवानिशी ठार मारले अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरुन व वैद्यकीय अहवालावरुन पो.स्टे. रामनगर येथे अप क्र. 84 /2024 कलम 302,143,147,148,149 भादवी सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि. नंदकिशोर उत्तमराव खेकडे, पो.स्टे. रामनगर हे करीत आहे.
जिल्ह्यात अनेक राजकीय पक्षात गुंडागिरी करणाऱ्यांची व अवैध धंदे करणाऱ्यांची मोठी फौज असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील काशीकर ज्यांच्यावर उपविभागीय वन अधिकारी यांची बंदूक हिसाकावून त्यांच्यावरच वार करण्याचा प्रयत्न व त्यांना धमकावून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी स्वप्नीलवर गुन्हे दाखल होते व या प्रकरणानंतरच काशीकर ची भाजप मधून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली होती.
अश्या व्यक्तीला शिवसेनेत प्रवेश देत स्वतः चे फॉर्चून(नशीब ) आता राजकारणात अतिशय रोचक असून असून पैशाचा गुर्मी त्यांच्या डोक्यात घुसल्याने त्यांची दादागिरी वाढली व पक्ष वाढविण्याऐवजी बँक बॅलन्स वाढविण्याच्या नादात हाल्फ मर्डर-मर्डर करत फिरण्याचे खुले लायसन्सच गिऱ्हे यांनी काशीकर ला दिले कि काय असा प्रश्न पडतो.
या संपूर्ण प्रकरणात महत्वाची बाब म्हणजे मारहाण करण्यात आलेले सरपंच हे शिवसेना (उबाठा) संबंधित होते व आता तर्स्व चक्क युवा सेना शहर प्रमुखाची हत्या करणाऱ्या स्वप्नील काशीकर ला कुणाचे अभय मिळत आहे याची चर्चा असून अश्या गुन्हेगारी वृत्तीच्या पदाधिकाऱ्याची अजूनही पदावरून अधिकृत हकालपट्टी न केल्याने उबाठा जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांची भूमिका संशयस्पद असून यात वाळू तस्करीचे आर्थिक राजकारण दडले असल्याचे शिवसैनिकांच्या चर्चेतून कळते.