
अज्ञात चोरट्याने एकाच शाळेतील दोन शिक्षिकेचे दोन मोबाईल घेऊन पसार
शिशु मंदिर प्रायमरी स्कूल येनापुर येथील घटना
गडचिरोली
चामोर्शी ( येनापूर ):-
दि.26 जानेवारी 2024
शिशु मंदिर प्रायमरी स्कूल येनापुर येथील घटना दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता च्या सुमारास घडली असून शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
तेव्हा पालक वर्ग व प्रतिष्ठित नागरिक युवक युवती मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी आले होते .आणि केजी वन, केजी टू ,तसेच एक ते पाचवी पर्यंतचे वर्ग असल्याने लहान मुलांना सजवण्याकरिता व त्यांच्याच मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम बघण्याकरिता त्यांचे पालक वर्ग आले होते. मुलांचे विविध प्रकारचे गाण्याचे डान्स असल्यामुळे तेथील शिक्षिका आपल्या मोबाईलचा वापर करून त्यांना वेगवेगळे त्यांच्या मोबाईल मधून गाणे लावून देत होते. आणि त्यांच्या वेगवेगळ्या गाण्यावरती वेगवेगळे गेटअप देण्याकरिता सजविण्याकरिता त्यांच्या गेटअप रूममध्ये फक्त पालक वर्गांचा समावेश होता, आणि आपल्याच विद्यार्थ्यांना स्टेज वरती घेऊन सादरीकरण करण्यामागे शिक्षिकेंचा समावेश होता. सदर शिक्षिका आपला मोबाईल गेटअप रूम मध्ये ठेवून लहान मुलांना स्टेजवर घेऊन त्यानंतर गेटअप रूम मध्ये गेले ,असता मोबाईल फोन दिसेनासे झाले तेवढ्यात इकडे तिकडे शोधा शोध केली विचारपूस केली परंतु मोबाईल कुठे सापडला नाही यावरून मोबाईल कुठे हरवला नसून अज्ञात चोरट्यांनी शिक्षिकेंच्या मोबाईलवर डोळा ठेवून असल्याने आणि शिक्षिका जसे रूम मधून बाहेर पडताच त्या दोन्ही शिक्षकांचे दोन्ही मोबाईल घेऊन अज्ञात चोरट्याने पसार झाल्याची घटना घडली .
तसेच आष्टी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे.तसेचत्यांनी पोलीस सायबर शाखेकडे तक्रार नोंदवली असल्याचे सांगितले. व त्यामुळे पोलीस मोबाईल व अज्ञात मोबाईल चोरट्याना पकडणार काय ? असा प्रश्न शिक्षकांना व तिथ असणाऱ्या नागरिकांना पडला आहे .