कापसाच्या शेतीत डुक्करांचा धुमाकूळ ; शेतकरी झालेत त्रस्त , वनाधिकाऱ्याने केली नुकसानीची पाहणी
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी :- प्रफुल उराडे ✍️✍️✍️

कापसाच्या शेतीत डुक्करांचा धुमाकूळ ; शेतकरी झालेत त्रस्त , वनाधिकाऱ्याने केली नुकसानीची पाहणी.
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रफुल उराडे ✍️✍️✍️
मो.नं . 7721022684
चंद्रपूर
पोंभूर्णा. (दि.२४) तालुक्यातील वेळवा येथील कापसाच्या शेतीत डुक्करांच्या धुमाकुळाने शेतकरी झालेत त्रस्त . वेळवा येथील शेतकरी अनेक दिवसांपासून डुक्करांपासून व अन्य वण्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान होत असल्याने त्रस्त होत आहेत. या प्रकरणी नुकसानीची पाहणी व वण्यप्राण्यांचे बंदोबस्त करण्याकरिता पोंभूर्णा येथील वनविभागाला शेतकरी अर्ज दिले असता आज दिनांक २४ ऑगस्ट ला वनाचे वनाधिकारी श्री. फनिंद्र गादेवर, श्री. अजय बोदे, श्री. मेश्राम व भंडारे यांनी वेळवा येथील शेतकऱ्यांच्या शेतीत जावून प्रत्येक्ष पाहणी केली असता नुकसान दिसुन आली.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल अर्ज करा अशी माहिती दिली परंतु शेतकरी डुक्करांच्या त्रासाला कंटाळुन व दिवसेंदिवस शेतीचे नुकसान होत असल्याने प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि काही उपाययोजना करावी अशी वेळवा येथील त्रस्त शेतकरी अमित अरुण केमेकार, नयन सुधीर मोरे, गजानन जयराम राऊत, अजय लोणारे आदी अनेक शेतकरी, पोंभूर्णा येथील वनाधिकाऱ्यांकडे मागणी केली.