Breaking
कृषीवार्ता

जमिनी वाचविण्यासाठी पीडित शेतकऱ्यांची आमदारांकडे भावनिक साद

मुख्य संपादक

 

 

जमिनी वाचविण्यासाठी पीडित शेतकऱ्यांची आमदारांकडे भावनिक साद

जमिनी वाचविण्यासाठी पीडित शेतकऱ्यांची आमदारांकडे भावनिक साद…

 

मुधोली चक न.२ येथील सभेत आमदारांना साकडे.

 

“मला दोन एकर जमीन आहे माझे दोन मुलं आहेत एक मुलगा अपंग आहे.आम्हाला जमीन द्यायची नाही आहे. जमीन आहे तर जमिनीच्या भरोषावर आम्ही आमचे पोट भरू शकतो.पैसा आज आहे उद्या नाही.साहेब तुम्हाला कितीही पगार असला तरी पण तुम्ही पैसा खात नाही शेवटी भातच खाता….”अशी भावनिक साद घालत विद्या कष्टी नावाच्या शेतकरी महिलेसह परिसरातल्या शेतकऱ्यांनी आपल्या वेदना आमदरांपुढे मांडल्या.

 ७ जानेवारी रोजी मुधोली चक नं.२ येथे भूमि अधिग्रहणाच्या बाबतीत पीडित असलेल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी आले असता मुधोली चक नं.२,जयरामपूर, सोमनपल्ली, गणपुर, मुधोली तुकूम लक्ष्मणपुर येथील शेतकऱ्यांनी आमदारांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाही असे म्हणत सरकारकडे आमचे मुद्दे मांडा असे निवेदन देत वेगवेगळ्या मागण्या केल्या.

 प्रमुख मागण्या :- 

१)शेतकरी कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाहीत.जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहण करणारा आदेश रद्द करावा.

२) शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्यासाठी शासनाचे जे अधिकारी येत आहेत त्यांना तात्काळ थांबवा.

३) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा वेळोवेळी धाक सांगत पोलीस निरीक्षक परिसरातल्या गावकऱ्यांवर जमावबंदीचा आदेश काढतात,हे लोकशाही असलेल्या देशात घातक आहे ज्यामुळे परिसरातल्या लोकांच्या मूलभूत अधिकारांचा भंग होत आहे,कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली शेतकऱ्यांचे हक्क डावलले जात आहे त्यासाठी पोलीस प्रशासननाला सूचना कराव्या..

४)आजपर्यंत चर्चा,निवेदन आणि अर्ज यांच्या माध्यमातून गावकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या.पुढच्या काळात रस्त्यावर उतरून आमचे हक्क हिरावून घेऊ.

यावेळी परिसरातले शेकडो शेतकरी महिला पुरुष उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे