
रानटी हत्तीच्या कडपाने शेतात घुसून पिक्कांची केली नासधूस !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली ( चांबरडा )
दि 25 नोव्हेंबर
मौजा चांबारडा ता. गडचिरोली येथे रानटी हत्तीच्या कडपाने शेत शिवारात घुसून पिक्कांची नासधूस करून हातात आलेले धान पीक पूर्णपणे नष्ट केल्याचे माहिती मिळताच जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी केले व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून तातळीने पंचनामा करण्याची व नुकसानीची भरपाई करण्याची विनंती केली.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, युवक काँग्रेसचे महासचिव नितेश राठोड, काँग्रेस नेते रामभाऊ ननावरे, जावेद खान, संदीप भैसारे, विलास भाऊ ठाकरे, चंदन मस्के व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
हातात आलेले पीक वनविभाग, प्रशासन, पालकमंत्री आणि वनमंत्र्याच्या दुर्लक्षतेमुळे गमवावे लागत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.