
जंगली हत्ती सह नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा
वनमंत्र्याकडे काँग्रेसची मागणी ; वनमंत्र्यांनी नियोजित दौरा रद्द केल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत दिले निवेदन…
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि 25 नोव्हेंबर
गडचिरोली ः
जंगली हत्ती आणि वाघाच्या हल्यात रोज निरपराध लोकांचा बळी जात आहे, शेती आणि घरांची प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे, ह्या अश्या वाढत्या हल्याने नगरकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित आहे, त्यामुळे जंगली हत्ती व नरभक्षक वाघाचा ड्रोन सर्वेक्षण करून तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, हत्ती, वाघ किंवा अन्य कोणत्याही वन्यप्राण्याच्या हल्यातील जखमी व मृत व्यक्तीच्या कुटुंबास तातडीने भरीव आर्थिक मदत करण्यात यावी, जंगली प्राण्यांच्या हल्यात नुकसान झालेल्या शेती आणि घराचे पंचनामे करून कुठल्याही जाचक अटी न लादता सरसकट मदत करण्यात यावी. वनपट्याचे प्रलंबित मागण्या निकाली काढून वनपट्टे व सातबाऱ्याचे वितरण करण्यात यावे यासह अनेक मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना, जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, आदिवासी सेल अध्यक्ष छगन शेडमाके, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, जिल्हाउपाध्यक्ष नेताजी गावतुरे, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के, हरबाजी मोरे, भैयाजी मुद्दमवार, महादेव भोयर, दिवाकर निसार, बाबूराव गडसूलवार, लालाजी सातपुते, सुदर्शन उंदीरवाडे, ढिवरू मेश्राम देवेंद्र भोयर, नितेश राठोड, मोहित अत्रे, श्रीनिवास ताटपल्लीवार, दिगेशवर धाईत, श्रीकांत भजभुजे, परशुराम गेडाम, बबिता उसेंडी सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.