वनपरिक्षेत्र अधिकारी ठाकरे चालवतात आपल्या निवास्थानातुनच प्रशासन!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

वनपरिक्षेत्र अधिकारी ठाकरे चालवतात आपल्या निवास्थानातुनच प्रशासन!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
कार्यकारी संपादक अनुप मेश्राम
वडसा :- ( बेडगाव )
दि 8 /11/2023.
वडसा वनविभागा अंतर्गत येत असलेले व वनपरीक्षेत्र कार्यालय बेडगाव येथील कार्यरत वनपरीक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे हे आपला कार्यालयीन प्रशासकीय कार्यभार आपल्या राहत्या निवास्थानातून चालवीत असतात. वनपरीक्षेत्र अधिकारी हे कार्यालयात कधीच बसत नाही. सपंर्क केला असता कधी फोनही उचलतही नाही.व फोनही करीत नाही, कार्यालयीन इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधी विचारणा केली असता ते नेहमीप्रमाणे आपले टेप वाजवीत असतात व साहेब आत्ताच कामानिमित्त बाहेर गेले असे येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला सांगत असतात.
मागील चार वर्षापासून वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत लक्ष्मीकांत ठाकरे हे आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याचे चित्र दिसत आहे अशा निष्काळजी अधिकाऱ्याची बदली कोल्हापूर,सोलापुर सारख्या ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी दलित पॅंथर चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते व विचार क्रांती न्युज पोर्टल चे संपादक अनुप मेश्राम यांनी केली आहे
वनपरिक्षेत्र अधिकारी ठाकरे चालवतात आपल्या निवास्थानातुनच प्रशासन!