विज वितरण उपकेंद्राला लागली आग ,जिवितहानी टळली !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
प्रतिनिधी / बल्लारपूर
कारवा रोडवरील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनजवळ टाकलेल्या कचऱ्याला काल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती. बल्लारपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला तात्काळ माहिती देण्यात आली.
बल्लारपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या परिसरातील नागरिक आपल्या घरातील कचरा एमएसईबी कार्यालयात भिंती वरून आत टाकत असल्याने या ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग असून आत साफसफाई न केल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या परिसरातील कचरा उचलण्यासाठी नगरपरिषदेचे वाहन रोज येत नसल्याने नागरिकांना आपल्या घराचा कचरा जंगलात टाकावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. जंगलाची भिंत कमी उंचीची असताना नागरिक कचरा टाकत आहेत.
अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे महावितरणच्या लाखो रुपयांचे केबल वायर जळण्यापासून दूर केले. येथील सुरक्षा रक्षक देखील आपले कर्तव्य बजावत आहेत. ते परिसरातील नागरिकांना कचरा टाकण्यासाठी मनाई करतात. आज अग्निशमन दल वेळेवर आले नसते तर लाखो किमतीच्या केबल्स जळून राख झाल्या असत्या.