
रानडुकराची शिकार करून मांसाची विक्री करणे पडले महागात , चार आरोपींना अटक
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
बल्हारशाह वन कर्मचार्याची कारवाई
राजुरा(प्रतिनिधी)- दिनांक 07 मे 2024 ला अवैधरित्या रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार करुन मास विक्री करीता वाहतुक करीत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांना प्राप्त झाली. माहितीचे आधारे बल्हारपुर शहरातील सास्ती पुलीया परिसरात सापडा रचुन आरोपी श्रीकृष्ण गुलाब पवार, रा. हिरापुर, सदाशिव भास्कर देवगडे, रा. हिरापुर, वसंता यादव तोडेकर, रा. बल्हारपुर व तोमरय्या राजेय्या धोबल्ला, रा. बल्हारपुर यांना रानडुक्कर वन्यप्राण्याचे मास 10 कि.ग्रा. सह ताब्यात घेतले.
वरील आरोपींची अधिक चौकशी केली असता ते रानडुक्कर वन्यप्राण्याचे मास विक्री करीता आणल्याची त्यांनी कबुली दिली. त्यांनतर मास विकत घेणारे आरोपी सुनील सदाशिव तुमराम, रा. महात्मा गांधी वार्ड बल्हारपुर, सावण सोजन बरसे, रा. गोकुलनगर वार्ड बल्हारपुर व जाणी पोचम गाजुल्ला, सुभाष नगर वार्ड बल्हारपुर यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी आरोपी वसंता यादव तोडेकर, रा. बल्हारपुर यांचे कडुन वन्यप्राण्याचे मास विकत घेत असल्याबाबत सांगितले असता वरील सर्व आरोपी 1 ते 7 विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2, 9, 39, 44, 51 व 52 अनव्ये प्राथमिक वनगुन्हा क्रमांक 08962/224045 दिनांक 07.05.2024 अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला असुन वनगुन्हात वापरण्यात आलेले 2 मोटार सायकल, इतर साहित्य व रोख रक्कम 16810.00 जप्त करुन जप्तीनामा नोंदविण्यात आला. या कार्यवाही मुळे वन्यप्राण्याची शिकार करुन मास विक्री करणाऱ्या टोळीचा मोठा रॅकेट उघडकीस आला.
सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग चे उपवनसंरक्षक, स्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत.सदर कार्यवाही दरम्यान क्षेत्र सहायक, ए.एस. पठाण, श्रीकेएन घुगलोत, बी.टी.पुरी, वनरक्षक सुधीर बोकडे, तानाजी कामले, देव आकाडे, सुनील नन्नावरे, धमेंद्र मेश्राम, .एस.आर. देशमुख, ए.बी. चौधरी, .एस.एस. नैताम यांनी स्वत: केले.