
पँथर गंगाधर गाडे साहेबांना अखेरचा निरोप
शासकीय मानवंदना…
औरंगाबाद
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि.7/5/24.
पँथर्स रिपब्लिकन पार्टी चे नेते माजी राज्यमंत्री गंगाधरजी गाडे यांचे आज निधन झाले. त्यांच्या निवासस्थानी येऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पत्नी सूर्यकांता गाडे, मुलगा सिद्धांत गाडे आणि कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि गंगाधर गाडे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून ऐतिहासिक नोंद असलेल्या मराठवाड्याच्या या औरंगाबाद राजधानी पॅंथर गंगाधर गाडे यांचे पार्थिव डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटच्या कमानी समोरील शहीद स्तंभाजवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर भडकल गेट या ठिकाणी ठेवून शेवटी नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात हजारोंच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले.
राजकारणी समाजकारणी भिक्खू संघ, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्प चक्र अर्पण केले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खा चंद्रकांत हांडोरे,भागवत कराड, जोगेंद्र कवाडे, खा इम्तियाज जलील चंद्रकांत खैरे पोलिस उपायुक्त नितीन वगाटे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी अंतिम दर्शन घेऊन अखेरचा निरोप दिला.
नामांतर आंदोलनातील लढवय्या नेता पँथर गंगाधर गाडे साहेबांच्या या अंतिम संस्कार विधीचे संपुर्ण चित्रण माझे सहकारी मित्र छायाचित्रकार संजय घनसावंत यांनी केले.