
नवीन रेशनकार्ड धारकांची ओरड! कार्डधारकांचे रेशंनदुकानात नावच जोडले नाही.
गडचिरोली.
दि.7/5/24
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम
कुजलेले ,फाटलेले , व जीर्ण अवस्थेत पडलेले रेशनकार्ड नव्यानेच तयार करण्यासाठी कार्ड धारकांना तहसील कार्यालयाचे सतत उंबरठे व अधिकाऱ्यांची मनधरणी करुन त्यांना आपआपले नवीन रेशनकार्ड तयार करून घ्यावा लागले .रेशनकार्ड तयार होवून,कुणाला वर्ष,तर कुणाचा दोन वर्षाचा कालावधी लोटला जात आहे ,परंतु सुस्तवलेल्या व मग्रूर अवस्थेत जगणाऱ्या तहसील कार्यालयातील अन्न विभागातील कर्मचाऱ्यांना नवीनरेशन कार्ड कार्डधारकांचा उपजीविकेचा जणू विसरच पडताना दिसतच आहे.
तसेच त्यांची नावे शहरातील विविध रेशन दुकानात जोडलेली नसल्यामुळे रेशन कार्डधारकांना त्यांना महिनेवारी भेटणाऱ्या अन्नधान्यांना मुकावे लागत आहे गरीब आणि गरजू लोकांना आज रेशन दुकानातून दोन रुपये किलोचा तांदूळ त्यांना वीस ते पंचेविस रुपये किलो प्रति भावाने विकत घेऊन स्वतःचीउपजीविका करावी लागत आहे.
अन्न विभागाने नवीन रेशन कार्ड धारकांची नावे शहरातील विविध रेशन दुकानात त्यांच्या नावाची नोंद करायला लावून ,त्यांच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करन्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता अनुप मेश्राम यांनी केली आहे