Breaking
चंद्रपूर

बीअर शाॅपीच्या परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेतांना दोन अधिक्षक तर एक निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले

मुख्य संपादक

 

बीअर शाॅपीच्या परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेतांना दोन अधिक्षक तर एक निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले ! 

चंद्रपूर 

दिनांक 7/5/24.

चंद्रपूर : बीअर शाॅपीच्या परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्यासह दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खाताड हे तीन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात कारवाई सुरूच असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांनी दिली.

तक्रारदाराने नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे बीअर शॉपीच्या परवान्यासाठी रितसर अर्ज केला होता. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खरोडे यांच्याकडून परवाना देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात होती. दरम्यान, खरोडे यांनी परवाना मंजूर करण्यासाठी स्वत:सह अधीक्षक संजय पाटील यांच्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली. लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. दरम्यान २४ एप्रिल २०२४, ३ मे २०२४, ७ मे २०२४ रोजी अशी तीनवेळा पडताळणी करण्यात आली. दरम्यान, दुय्यम निरीक्षक खारोडे यांनी कार्यालय अधीक्षक अभय खाताळ यांच्यामार्फत एक लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्यानुषंगाने तिघांवरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे, यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूरच्या पोलिस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांच्या नेतृत्वात पो. हवा. नरेशकुमार नन्नावरे, हिवराज नेवारे, संदेश वाघमारे, राकेश जांभूळकर, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम आदींनी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे