
अबब… चक्क पुलावरून ट्रक खाली कोसळला
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
मुख्य उपसंपादक
स्वप्नील मेश्राम
गडचिरोली :- / (आष्टी).
आज दुपारच्या सुमारास चंद्रपूर कडून आष्टी कडे येत असलेला ट्रक आष्टी वैनगंगा नदीच्या पुलावरून चक्क खाली कोसळल्याची घटना आज दि.२३ ऑक्टोबर २०२३ ला ४:३० च्या सुमारास घडली आहे. तसेच त्या ट्रक चा ट्रकचालक हा बचावला आहे व कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
तसेच अनेल दिवसापासून त्या पुलावर खड्डे पडलेले आहेत व त्यामुळे अनेक जीव गमवावे लागले व अनेक जीवघेणी घटना घडत असून ये- जा करणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास होत असुन या आधी प्रशासनाला नागरिकांकडून माहिती देण्यात आली होती तरी सुद्धा शासनाने या कडे कानाडोळा केल्यामुळे असे अपघात होत असुन नागरिकांना जीवाला सुद्धा मुकावे लागत आहे व आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवुन या पुलावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच नविन पुलाचे काम केव्हा पूर्ण होईल याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.