Breaking
आरोग्य व शिक्षणगडचिरोली

रथसप्तमी चे औचित्य साधून गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन

मुख्य संपादक

 

रथसप्तमी चे औचित्य साधून गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन

 

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज.

गडचिरोली ,

रथसप्तमी चे औचित्य साधून गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे , कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण,संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग डॉ. अनिता लोखंडे, संचालक विद्यार्थी विकास डॉ. प्रिया गेडाम,योगशास्त्राचे अभ्यासक मिलिंद उमरे उपस्थित होते.

 

 

आर्ट ऑफ लिविंगच्या योग शिक्षिका अंजली कुळमेथे ,
यांनी विविध आसने, प्राणायाम आणि मंत्रोच्चाराचे महत्व अधोरेखित करीत व्यायामामुळे शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर पडतात आणि रक्तभिसरणाची प्रक्रिया अधिक सुलभ होते. आज मनुष्याचे आयुष्यमान कमी झाले असून शरीर व मनाची एकाग्रता वाढवणे खूप आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच सूर्यनमस्कार आणि मेडिटेशन चे प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

या कार्यक्रमाला उपकुलसचिव वित्त व लेखाविभाग देवेंद्र झाडे,सिनेट सदस्य सतीश पडोळे,जनसंपर्क अधिकारी वर्षा कोल्हे यांच्यासह शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संचालन योगशास्त्राचे अभ्यासक मिलिंद उमरे, आभार संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण डॉ. अनिता लोखंडे यांनी

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे