
पत्नीने 8महिण्यापासून पतीला सोडुन माहेरी गेल्याने, पतीने घेतला गळफास …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
चिमुर ( किटाळी )
दिनांक 29 /जाने. 24
चिमुर किटाळी येथील विवाहित युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.हि घटणा सोमवार दिनांक 29 जाने.24 लासकाळी सात वाजता उघडतीस आली .पत्नी 8 महिण्यापासून माहेरी जावुन राहत असल्याने चक्क पतीने नैराश्यातुन आत्महत्या केली आहे असे सांगितले जात आहे.
प्रमोद नागोराव रासेकर वय 35 वर्ष असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.तसेच तो सुतारकाम करीत होता.व प्रमोदची पत्नी माहेरी 8 महीण्यापासुन तिच्या वडिलांकडे राहत असल्याची माहिती आहे.
घटणेच्या आदल्या दिवशी रविवारी नेहमीप्रमाणे झोपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आतून दार बंद असल्याने फटीतून शेजाऱ्यानी बघीतलेअसता प्रमोद गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला या घटणेची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली.पोलीस घटणास्थळी पोहचून पंचनामा केला.पुढील तपास मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनात चिमुर पोलीस करीत आहे.ह्या अशा घटणेमुळे सर्व त्र हळहळ व्यक्त केली जात आहे.