
डोमा चौरस्त्यावर भीषण अपघातात पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी..
ब्रेकिंग न्युज
चिमूर
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक13/5/24/
चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डोमा चौरस्त्यावर आज दिनांक 13ला दुपारच्या सुमारास दुचाकीने पती – पत्नी जंगलातुन तेंदूपत्ता तोडून डोमा येथे स्वघरी परत येत असतांना स्कॉर्पिओ या चारचाकी वाहनाने दुचाकी वाहनास जबर धडक दिल्याने दुचाकीने पेट घेतला व दुचाकी चालक श्रावण बाजीराव गुरनुले राहणार डोमा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी हि गंभीर जखमी झाली आहे.
घटनेची माहिती होताच भिसी पोलीसांना माहिती देण्यात आली तसेच जखमी ला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.त्यावर उपचार सुरू आहे. चारचाकी वाहन घटनास्थळावरून पसार झाल्याचे बोलले जात आहे.मृतकाचे शव विच्छेदन करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले आहे.धडक देणारी गाडी कुणाची याचा पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे.